Bhandardara Tourism : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा सजला, पण ह्या सर्व गोष्टीना बंदी

Ahmednagarlive24 office
Published:

अकोले तालुक्याच्या पश्चिमेला असणार्‍या भंडारदरा पर्यटनस्थळावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा नगरी सजली आहे, मात्र वनविभागाच्या सादनदरीची रॅपलिंग बंदच्या निर्णयामुळे उत्साही तरुणांच्या आनंदात विरजण पडणार आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा हे निसर्ग पर्यटन असुन दरवर्षी लाखो पर्यटक भंडारदर्याला भेट देत असतात.

येथे टेंट व्यवसाय जोमाने उभा राहीला असून अनेक तरुणांची पंसती टेंटमध्ये मुक्कामी राहण्यासाठी असते. याही वर्षी भंडारदऱ्यामध्ये थर्टी फस्टसाठी पर्यटकांची पहिली पसंती टेंट व्यवसायासाठीच आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भंडारदरा परिसरातील स्थानिक व्यावसायिकांनी आपआपले टेंट धरण काठावर तसेच अभवारण्य क्षेत्रात रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने टेंट व्यावसायासाठी वन्यजीव व पोलिस विभागाने पर्यटकांसाठी थर्टी फस्टसाठी ‘परवानगी दिली असली तरी हरिश्रंद्रगड, सांदनदरी, कळसुबाई, रतनगड, पाबरगड, अलंग – कुलंग – मलंग या गडांवर वेगवेगळी बंधने लादली आहेत.

यामध्ये वन्यजिव विभागाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या हरिश्वंद्रगड, रतनगड, अलंग – कुलंग – मदन या गडांसह पाबर गडावर रात्री प्रवेशासह मुक्कामास पर्यटकांना मज्जाव केला आहे, जर कुणी गडावर रात्री जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

सांदनदरी या ठिकाणी आत्ताच तीन चार दिवसांपर्वी एका मुलीचा दरीत पडुन मृत्यु झाला. यासंदर्भात वेगवेगळी मते प्रदर्शित व्हायला लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन दरीमध्ये पर्यटकांना रॅपलिंग करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विशेष म्हणजे ही दरी वरिष्ठ पातळीवरुन आदेश येईपर्यंत कायमस्वरुपी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी दिली आहे.

या परिसरात टेंट लावण्यास वनविभागाकडुन ‘परवाणगी देण्यात आली आहे.नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात कळसुबाई शिखरावर गर्दी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे; मात्र गडावर आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आई कळसुबाईचे मंदीर आहे,

या मंदीराचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून ‘जहागिरदारवाडीचे सरपंच पंढरीनार खाडे यांनी शिखरावर प्रवेश करण्याअगोदरच गावाच्या बाहेर दिवस- रात्र पर्यटकांची कसुन तपासणी करणार असल्याचे सांगितले आहे. तपासणीमध्ये दारु व इतर आमली पदार्थ आढळुन आल्यास गडावर प्रवेश मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe