RBI ची मोठी कारवाई! राज्यातील ‘या’ बँकेला ठोठावला 13 लाखांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती

Published on -

RBI Bank : देशाची सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणेजच RBI ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल 4 सहकारी बँकांना 44 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार RBI ने विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. मात्र या बँकांच्या ग्राहकांकडून होणाऱ्या व्यवहारांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ज्या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – तमिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, जनता सहकारी बँक आणि बारण नागरीक सहकारी बँक.

यापैकी सर्वाधिक 16 लाख रुपयांचा दंड चेन्नईस्थित तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ठोठावण्यात आला आहे.

RBI ने का दंड ठोठावला

बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला 13 लाख रुपये आणि चेन्नईस्थित तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेला 16 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे आरबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही बँकांनी निश्चित रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (डीईएएफ) मध्ये निर्धारित वेळेत हस्तांतरित करण्यात अयशस्वी ठरले, त्यामुळे त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.

पुण्यातील जनता सहकारी बँकेला ‘ठेवीवरील व्याजदर’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे बँकेने आणखी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हे पण वाचा :-  Dream Meaning: स्वप्नात ‘हे’ फळ दिसत असेल तर समजून घ्या लवकरच होणार धनप्राप्ती अन् घरात येणार सुख-समृद्धी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News