बिग ब्रेकिंग : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती.

इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळी ताब्यात घेतले होते. सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांची चौकशी सुरु झाली होती शरद पवार म्हणाले, त्याच्यात काय बोलायचं त्यात काही नवीन नाहीये.

सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातोय त्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की, आज नाही तर उद्या हे कधीतरी घडेल.

कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल अशी आम्हाला खात्री होती.

त्यामुळे त्याबाबत अधिक भाष्य करण्याची गरज नाही. नेमकी कशाची केस काढली त्यांनी… एक साधी गोष्ट आहे. काहीही झालं आणि त्यात मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं असंही शरद पवार म्हणाले.

दरम्यान नवाब मलिक यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांची चौकशी सुरु असलेल्या ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.

नवाब मलिक यांना अटक झाल्यास या भागात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ईडीच्या कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर गाड्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच या परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe