बिग ब्रेकिंग : हे नेते म्हणाले लवकरच राज्यात सत्तांतर !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  गेल्या दाेन वर्षांत महाराष्ट्र खूप मागे गेला आहे. महािवकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्यात अराजकता माजली आहे. प्रत्येक घटक नाराज आहे. त्यामुळे भाजपाला राज्याच्या विकासासाठी पुढे यावेच लागणार आहे.

लवकरच राज्यात गनिमी काव्याने सत्तांतर घडवून आणणार असल्याचे विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत करण्याची घाेषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करून केवळ वसुलीच्या कामाला हे सरकार लागले आहे.

त्यामुळे या सरकारकडून राज्यातील जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राज्यात सध्या एसटीचा संप सुरू आहे. ४३ कामगारांनी आत्महत्या केल्या तरी सरकारला जाग आली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड आक्राेश आहे. कामगारांचे आंदोलन माेडून काढण्याच्या प्रयत्नात सरकार असताना भाजपाने कामगारांना साथ दिली.

त्यामुळे किमान चर्चेसाठी तरी या सरकारला वेळ मिळाला; अन्यथा सरकारने या कामगारांचे आंदोलनं चिरडून टाकले असते. सरकारने दिलेली पगारवाढ ही फसवी असल्याचा आराेप कामगारांचा आहे. सरकारने कामगारांना दमदाटी न करता सामंजस्याने, चर्चेतून मार्ग काढावा, अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळेल.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या दिल्ली वारीसंदर्भात बाेलताना ते म्हणाले की, भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चांगले काम करत अाहेत. त्यामुळे अध्यक्ष बदलण्याचा प्रश्नच नाही. संघटनात्मक चर्चेसाठी हे दाेघेही दिल्लीत गेले हाेते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe