अक्षय तृतीयेच्या आधीच मुंबईकरांसाठी मोठी गुड न्यूज! 10 एप्रिलला सुरू होणार मुंबई मधील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग

Published on -

Mumbai Metro : महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला. 30 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा झाला असून आता 30 एप्रिल ला अक्षय तृतीया चा सण साजरा होणार आहे. दरम्यान अक्षय तृतीयेच्या आधीच देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थातच मुंबईला एक मोठी भेट मिळणार आहे. मुंबईकरांसाठी एक नवा मेट्रो मार्ग लवकरच खुला केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई मेट्रोमार्ग 3 ज्याला एक्वा लाईन म्हणू नये ओळखले जाते ही मेट्रो लाईन येथे दहा तारखेला म्हणजेच दहा एप्रिल 2025 रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर वृत्त जाणून घेणार आहोत.
काय आहेत डिटेल्स?

खरे तर ३३.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग 3 चा पहिला टप्पा नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आला. या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे कॉलनी ते वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हा मार्ग ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झाला.

हा 12.69 किमीचा पहिला टप्पा 7 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आला. या टप्प्यात BKC, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) T1, सहार रोड, CSMIA T2, मारोल नाका, अंधेरी, SEEPZ आणि आरे कॉलनी JVLR यांसारखी प्रमुख स्थानके आहेत. यातील आरे कॉलनी JVLR हे एकमेव जमिनीवरील स्टेशन आहे.

बाकी सर्व स्थानके भूमिगत आहेत. या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत बोलायचं झालं तर हा दुसरा टप्पा 10 एप्रिल 2025 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. हा दुसरा टप्पा म्हणजेच बीकेसी ते वरळी हा मार्ग सुरु झाल्यावर, मेट्रो-3 अधिकृतपणे शहरात प्रवेश करणार आहे. हा टप्पा धारावी आणि सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोने जोडणार आहे.

या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश राहणार आहे. हा दुसरा टप्पा 10 एप्रिल 2025 रोजी खुला होण्याची दाट शक्यता आहे. खरे तर हा टप्पा मार्च अखेरीस सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असे म्हटले जात होते मात्र नियोजित वेळेत या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे आता दहा एप्रिल पर्यंत तरी हा टप्पा सुरू होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

मुंबईकरांना अक्षय तृतीयेच्या आधीच एक मोठी भेट मिळणार आहे. मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा अक्षय तृतीया च्या आधीच मुंबईकरांसाठी सुरू केला जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. 10 एप्रिल 2025 रोजी मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News