मोठी बातमी ! आता घरी पूर्वीचेच मीटर राहणार, ‘स्मार्ट मीटर’ रद्द , सरकारचा निर्णय मागे

Pragati
Published:
fadnvis

 

मागील काही दिवसांपासून विजेचे स्मार्ट मीटर येणार अशी चर्चा होती. तशी वर्क ऑर्डर निघाल्याचेही समजले होते. परंतु आता याविरोधात वाढत चाललेला असंतोष पाहता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. आता पूर्वीचीच पद्धत कायम राहणार आहे.

ऊर्जामंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिलीये.

त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.

स्मार्ट मीटरचे कंत्राट कुणाकुणाला दिले होते
अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. साधारण हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती.

परंतु आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ग्राहकांना मोबाईलवर मिळणार होती माहिती
स्मार्ट मीटर मध्ये ज्या पद्धतीने आपण मोबाईलला रिचार्ज करतो त्या पद्धतीने स्मार्ट मीटरला रिचार्ज करावे लागणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर किती वीज वापरली, किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती मिळणार देखील दिली जाणार होती. त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना नियोजन करता आले असते.

निवडणुकीसाठी नाराजगी नको
दरम्यान विधानसभा तोंडावर आहे. या निवडणुकीच्या तोंडावर जनतेची नाराजगी आता सरकार ओढवणार नाही. वीजग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्येही याबाबत असंतोष होताच. या मीटरमुळे विजेचे बिल अधिक येईल असे ग्राहक म्हणत होते तर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर स्मार्टमीटरमुळे गदा येईल असे मत काही कर्मचाहरी संघटना व्यक्त करत होत्या.