Big Offer : जर तुम्ही Google Pixel 6a हा स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न बाळगत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण आज आम्ही तुम्हाला हा स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात कसा खरेदी शकता याबद्दल सांगणार आहे.
फ्लिपकार्ट या फोनवर सध्या जबरदस्त ऑफर देत आहे. सवलत, एक्सचेंज ऑफर एकत्र करून, Google चा शक्तिशाली फोन 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. याचा अर्थ प्रिमियम फोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येऊ शकतात.
Google Pixel 6a चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट फक्त 8,999 रुपयांमध्ये घरी आणले जाऊ शकते. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या डिव्हाइसवर 31% सूट देत आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत 43,999 रुपयांवरून 29,999 रुपयांवर आली आहे.
याशिवाय फ्लिपकार्ट इतर ऑफर देखील देत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनची किंमत 9000 रुपयांच्या खाली आणू शकता. तुमच्याकडे जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असल्यास, तुम्ही Google Pixel 6a ची किंमत आणखी खाली आणण्यासाठी वापरू शकता.
यावर अनेक बँक ऑफर्स आहेत ज्यांचा लाभही घेता येईल. Flipkart Axis Bank कार्डांवर 5 टक्के कॅशबॅक आणि HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 1000 सूट मिळू शकते.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर यात 6.14-इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे, आणि कॅमेरा म्हणून यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य सेन्सर 12.2 मेगापिक्सल्सचा आहे आणि दुसरा सेन्सर 12 मेगापिक्सल्सचा आहे. या फोनमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल.