ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव ; कोपरीत ५ फेब्रुवारी पर्यंत चिकन, मटण विक्रीला बंदी

Mahesh Waghmare
Published:

२३ जानेवारी २०२५ ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून, ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता.हा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला ५ फेब्रुवारीपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव वाढत आहे.तसे पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला पाठवले आहे.त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा देखील सर्तक झाली आहे. त्यानुसार यावर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.

तसेच पुरेसा औषध साठा, डॉक्टरांसह इतर पथके देखील सज्ज झाली आहे.सध्या कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बर्ड फ्लूच्या पाश्र्वभूमीवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.

या रुग्णालयात एकूण १९ बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यातील १५ साधे तर आयसीयूचे बेड आहेत, तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचे पथकही तयार ठेवण्यात आले आहे. या येथे रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे महापालिकेचे माणणे आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

तर पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ आरआरटी पथक पव्हियन इन्फल्यूएंजा कंट्रोल मार्गदर्शन तत्त्वे २०२१ अन्वये स्थापन करण्यात आले आहे.या भरारी पथकांमध्ये पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग, कोंडवाडा विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग येमील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

एकियन इन्फ्ल्यूएंजा मार्गदर्शन उत्याप्रमाणे पॉलिटिका सापडलेल्या पक्षांच्या ठिकाणापासून एक किलोमीटर क्षेत्रात सर्वच चिकन व अंडी विक्री दुकाने जिह्वाधिकारी व पंडाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेली आहेत, तसेच सर्वेक्षण क्षेत्रात सर्व अंडी व चिकन मांस विक्रेते यांना स्वच्छता बाळगण्याबाबत समज देण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe