भाजपा सरकारने सर्वसामान्यांसाठी योजना सुरु करुन जनतेला दिलासा दिला – ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखालील केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरु करुन जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. तसेच राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवान निर्णय घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रमातून नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावे.

नुतन शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांची निवडीने कार्यकर्त्यांचे संघटन आणखी मजबूत करतील. पक्षातील त्यांचे योगदान आणि अनुभवाने पक्षाचे कार्य सर्वांपर्यंत पोहचवतील, असा विश्वास पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अॅड. अभय आगरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री तथा महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार केला. याप्रसंगी सत्कारास उत्तर देतांना अॅड. आगरकर यांनी पक्षाने दिलेले जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे पार पाडू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम काम करु. जिल्ह्यात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल, असे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe