Maharashtra News : अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी तिकीट बुकिंग करणाऱ्या चाकरमान्यांना अवघ्या काही मिनिटांतच आरक्षण फुल्ल झाल्याचा अनुभव आला. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी १५६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड,
थिविम आणि करमाळी या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, सर्व गणपती स्पेशलसाठी बुकिंग २७ जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर उघडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.