Maharashtra News : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिप्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
परंतु सरकार कडून सातत्याने मुदतवाढ मागितली जात आहे. सरकारने या प्रकरणाची आता हालचाली सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे १२ आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युलादेखील निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-10-04T075744.131.jpg)
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती अपेक्षित होती. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांच्या नावांची शिफारस केली होती.
परंतु तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने सुचविलेल्या नावांची नियुक्ती केली नाही. कोश्यारी यांनी दोन वर्षांहून अधिक काळ याबाबत निर्णय न घेतल्याने महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात धाव घेतली होती.
राज्यात पुन्हा सत्ता पालट झाली. त्यानंतर पुन्हा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबत हालाचाली सुरु झाल्या होत्या. शिंदे सरकारने याबाबत आपल्या मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. पण सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली तेव्हा कोर्टाने नियुक्तीवर स्थगितीचा आदेश दिला.
महाविकास आघाडीने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिप्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. मात्र, राज्य सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे सध्या या प्रकरणाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अचानक हे प्रकरण अचानक पुढे सरकू लागले आहे. याबाबत मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या माहितीनुसार महायुतीचा फॉर्म्युला फायनल झाला आहे.
महायुतीचा नेमका फॉर्म्युला कसा असणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. विधान परिषदेच्या आमदारांसाठी ६ – ३ – ३ फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. भाजपला सहा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ आमदारांची नावे लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.