BSNL Recharge Plan : बीएसएनएलचे सर्वात स्वस्त प्लॅन, 18 रुपयांपासून होतात सुरू; सीम चालू ठेवण्यासाठी फक्त हे 6 रिचार्ज सर्वोत्तम

Ahilyanagarlive24 office
Published:

BSNL Recharge Plan : अनेक सिमकार्ड कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन देत असते. यामुळे ग्राहकांना याचा फायदा होतोच सोबत कमी पैशात त्यांचे चांगले मनोरंजन होत असते.

देशात सध्या 5G सेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र सध्या महागाईच्या काळामध्ये अनके कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

परंतु सध्या तुमच्यासाठी BSNL कंपनी सर्वात टिकाऊ आणि स्वस्त रिचार्ज घेऊन आली आहे. हे रिचार्ज करून तुम्ही तुमचे सिमकार्ड चालू ठेवू शकता. यामध्ये 18 रुपयांपासून रिचार्ज सुरु होतात. दरम्यान, आज आम्ही तुमच्यासाठी 6 सर्वोत्तम रिचार्ज घेऊन आलो आहे. सविस्तर खाली जाणून घ्या….

BSNL भारतातील आपल्या ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलसह विविध प्रीपेड योजना ऑफर करते.

18 रुपयांचा प्लॅन 2 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज 1GB डेटासह अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो.

75 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 मिनिटांपर्यंत लोकल आणि एसटीडी कॉल, 2GB मोबाइल डेटा आणि 30 दिवसांसाठी पर्सनलाइझ रिंगबॅक टोन उपलब्ध आहेत.

94 रुपयांच्या प्लॅनमध्ये 200 मिनिटांचा लोकल आणि एसटीडी टॉकटाइम आणि 30 दिवसांसाठी 3GB मोबाइल डेटा मिळतो.

97 रुपयांच्या प्लॅनमध्ये 18 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल, 2GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात.

99 रुपयांच्या प्लॅनमध्ये 22 दिवसांसाठी मोफत व्हॉईस कॉल आणि वैयक्तिक रिंगबॅक टोन सेवा उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe