Maharashtra news : मुंबईतील गाजलेल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे.
या प्रकरणात आर्यन खान आणि मोहक यांच्याकडे ड्रग्ज मिळाले नसल्याचे त्यात म्हटले आहे. म्हणजेच एनसीबीच्या तापस पथकाने ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लिन चिट दिली आहे.
उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करतानाच आर्यन खानकडे ड्रग्ज आढळून आल्याचे सिद्ध होत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता चार्जशीट दाखल करताना खुद्द तपास पथकानेही त्याला क्लीन चीट दिली असल्याचे दिसून येते.
मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ एनसीबीने छापा टाकत ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. तो आणि त्याच्यासह इतर १९ जणांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अमली पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करणे, त्यांची खरेदी विक्री करणे यासाठी आर्यनवर कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणात आर्यनसह इतर १७ जणांची जामिनावर सुटका झाली आहे. याचे दोषारोपपत्र आज कोर्टात दाखल करण्यात आले. आर्यन खान याला यामध्ये जाणीवपूर्वक अडकविले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरवातीपासूनच होत आहे.