Cibil Score : सावधान ! ‘या’ छोट्या चुकांमुळे खराब होतो सिबिल स्कोर, कर्ज घ्यायचे असेल तर असा वाढवा सिबिल स्कोर…

Ahmednagarlive24 office
Published:
cibil score

Cibil Score : आजच्या स्थितीत सर्व जण स्वतःचा उदयॊग सुरु करण्यामध्ये व्यस्त आहेत, अशा वेळी नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेकजण कर्ज घेत असतात. मात्र अनेकांना कर्ज मिळवताना सिबिल स्कोरबाबत अनेक अडचणी येत असतात.

कारण तुम्ही कर्ज घेताना प्रामुख्याने बँकेकडून तुमचं सिबिल तपासलं जातं. कोणतेही कर्ज घेत असताना सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा कर्ज घेण्यासाठी अतिशय उपयुक्त घटक आहे.

300 ते 900 या दरम्यान सिबिल स्कोर गणला जातो. याचा अर्थ असा की ज्याचा सिबिल स्कोर चांगला त्याला कर्ज लवकर मिळतं. काही मीडिया रिपोर्टनुसार, ज्या व्यक्तींच सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतं अशा व्यक्तींना कोणतेही बँक कर्ज लवकर देते.

परंतु ज्यांचा सिबिल स्कोर फारच कमी असतो अशा व्यक्तींना कर्ज देण्यासाठी बँका शक्यतो टाळाटाळ करतात. म्हणून हा स्कोर चांगला ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आज आपण सिबिल स्कोर खराब कोणत्या गोष्टीमुळे होतो, जाणून घेणार आहोत.

सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर खराब होण्याची महत्वाची कारणे

समाजातील अनेक जण क्रेडिट कार्ड वापरत असतात. परंतु या व्यक्ती अनेकदा त्यांना मिळत असणाऱ्या क्रेडिट लिमिट पैकी सुमारे 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लिमिट वापरत असतात.

याचाच अर्थ असा होतो की अशी व्यक्ती ही आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्जांवर पूर्णपणे अवलंबून असल्याचे गृहीत धरले जाते. यामुळे त्या व्यक्तीच्या सिबिल स्कोर वर याचा सरळ परिणाम होतो.

परिणामी हा स्कोर पूर्णपणे खराब होतो. म्हणून क्रेडिट लिमिट पैकी केवळ 30 टक्के लिमिट वापरायला हवी पाहिजे असा तज्ञ सल्ला देतात. बऱ्याचवेळा मोबाईल, क्रेडिट कार्ड,पाणी, वीज, लाईटबिल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे देणे वेळेवर संबंधित व्यक्तींकडून भरण्यात येत नाहीत.

हे सुध्दा आपला सिबिल स्कोर कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत असते. याशिवाय बरेचजण पूर्ण पेमेंट करत नाहीत. घेतलेल्या कर्जाचे हप्ते पूर्ण भरले नाहीत तरीही सिबिल स्कोर वर इफेक्ट होतो.

त्यामुळे कर्जाचे वेळेवर पेमेंट करणे आणि पूर्ण पेमेंट करणे आवश्यक ठरते. तसेच अनेक लोकांचे जोड खाते असते. यामुळे जोडखाते असणाऱ्या व्यक्तीनी आपल्या खात्यासोबतच जोड खात्यावर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

आपल्या जोडीदाराने जर वेळेवर कर्जाचे हप्ते किंवा इतर थकबाकी भरली नाही तरी सुधा याचा परिणाम म्हणून सिबिल स्कोर कमी होतो. म्हणून याची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्यापैकी बरेच जण सिबिल स्कोर कधीच चेक करत नाही. यामुळे देखील हा स्कोर कमी होत असतो. प्रत्येक चार महिन्यांनी आपला सिबिल अहवाल चेक केला पाहिजे असं मत काही लोक व्यक्त करतात.

बरेच जण नवीन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी किंवा कर्ज घेण्याकृता वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करतात. असं एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी अर्ज केल्यामुळे देखील आपला सिबिल स्कोर कमी करण्यास कारणीभूत ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe