संत भगवानबाबांची मूर्ती जाळल्याप्रकरणी स्वप्निल शिंदेला अटक.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओ मध्ये सूरु असलेल्या संत भगवानबाबा यांच्या मूर्तीच्या काही भागांची अज्ञात इसमाने स्टुडिओ तुन बाहेर शेतात आणून जाळल्याची घटना घडली होती.

यासंदर्भात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती त्या अनुषंगाने पारनेर पोलिसांनी या जागेचा मालक असलेला स्वप्निल सुरेश शिंदे, वय ३५ वर्ष, रा. गुलमोहर रोड, अहमदनगर यास अटक केली आहे.

आरती प्लॅस्टिक कारखाना अहमदनगर ते कल्याण रोड लगत भाळवणी ता. पारनेर येथे आरोपी स्वप्निल सुरेश शिंदे रा. गुलमोहर रोड अहमदनगर याचे मालकीचे जागेमध्ये भगवान बाबाचे मुर्तीचे भाग बनविण्याचे काम चालु होते.

ऑक्टोबर २०१८ मध्ये तयार झालेली मुर्ती सावरगाव जि. बीड येथे पाठवुन दिली. सदर मुर्तीमध्ये काही सुधारणा करणे त्यांना आवश्यक वाटले म्हणुन त्यांनी मुर्तीच्या पाठीमागील भाग बनविण्याचे काम पुन्हा सुरु केले होते.

सदर बनवित असलेल्या भागापैकी कलाकृतीचा पाठीचा भाग तोडुन कारखान्याच्या पाठीमागे नेवुन जाळल्याचे त्यांना दिनांक ०७/०१/२०१९ रोजी दिसुन आले तसेच त्यांचे मालकीचे त्याठिकाणी असलेले वेल्डींग मशीन, हॅड ग्राईडर मशीन, ड्रील मशीन व वुड कटर असे साहित्य चोरीला गेल्याचे समजुन आले. 

सदरचा प्रकार कंपनीचा मालक स्वप्निल शिंदे याने केले असल्याबाबत तक्रार दिली होती त्यामध्ये आरोपी स्वप्निल सुरेश शिंदे, वय ३५ वर्ष, रा. गुलमोहर रोड, अहमदनगर यास आज रोजी अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment