Maharashtra news : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्यावर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका चित्रपटगृहात जाऊ हा चित्रपट पाहिला. मात्र, त्याचा शेवट न पाहताच ते बाहेर पडले.यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ठाकरे यांनीच उत्तर दिले आहे.
‘चित्रपटाच्या शेवटच्या १० मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग मी पाहू शकलो नसतो. आनंद दिघे गेले तेव्हा आमच्या सगळ्यांवर आघात झाला होता.
आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब ठाकरे मी पाहिले आहेत. त्यामुळे मी चित्रपट संपण्यापूर्वीच चित्रपटगृहातून बाहेर पडलो,’ असे ठाकरे यांनी सांगितले.चित्रपटातील शेवटच्या दृष्यात आनंद दिघे रुग्णालयात असताना राज ठाकरे आणि नारायण राणे त्यांना भेटण्यासाठी गेल्याचे दाखविण्यात आलेले आहे. हे दोघेही नेते आता शिवसेनेसोबत नाहीत.