अहमदनगर :- शहरात एका महिलेला किरकोळ कारणातून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण झाली. ही घटना भिंगारमधील एका चप्पल दुकानात घडली.
याप्रकरणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, स्टेशन रोडवरील अक्षता गाईन भागात राहणारी एक ५० वर्षांची महिला भिंगार येथील वेशीजवळ असलेल्या दीपक भिटोरीया यांच्या चप्पल दुरुस्तीच्या दुकानात आली.
तिने उसने दिलेले पैसे मागितले तेव्हा आरोपींनी तिला धरुन केस ओढून मारहाण केली. तसेच तिचा हात ‘ पिरगळून तिला विवस्र करण्याचा प्रयत्न करून लाज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला.
पायावर, पोटावर पायातील बुटाने मारहाण करुन तिघांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. पुन्हा पैसे मागायला आली तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
पिडीत महिलेने याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांत भिटोरिया, सीमा दिपक भिटोरिया, पूनम, ( सर्व रा आलमगिर , भिंगार ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.