अमरावती : शेतात रखवालदार म्हणून काम करणाऱ्या दारूड्या पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. क्रौर्याची परिसीमा गाठून पत्नीच्या गुप्तांगात काठी ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना नजीकच्या धोतरखेडा शेतशिवारात आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी क्रूरकर्मा पतीस अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू तोटा चढोकार (५०) रा.कामीदा, भैसदेही असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे तर रूख्मा विष्णू चढोकार (४५) असे मृतक पत्नीचे नाव आहे.

परतवाडा येथील रहिवासी दिपेश अग्रवाल यांच्या मालकीच्या धोतरखेडा शिवारातील शेतात चढोकार दाम्पत्य गेल्या दोन महिन्यांपासून रखवालदार म्हणून कामाला होते. शेतातील झोपडीतच ते दोघे राहत होते. गुरूवार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी चढोकार दाम्पत्य बाजारातून खरेदी करून झोपडीवर परतले. यावेळी मद्यधुंद अवस्थेत विष्णूने पत्नी रूख्मा यांच्यासोबत वाद घातला.
या वादातून त्याने पत्नीला काठीने अमानुष मारहाण केली. विष्णू एवढ्यावरच थांबला नाही. दारूच्या नशेत त्याने पत्नी रूख्मा यांच्या गुप्तांगात काठी ठेचून त्यांची हत्या केली. रात्रभर रूख्मा ह्या रक्ताच्या थारोळ्यात शेतातील झोपडीमध्ये पडून होत्या.
पती विष्णूही त्याठिकाणी बसला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बाजूच्या शेतातील रखवालदार विष्णू चढोकारच्या झोपडीजवळ गेला. यावेळी त्याला रूख्मा ह्या झोपडीत मृतावस्थेत आढळून आल्या.
- शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
- प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार Vivo V60; 3 कलर ऑप्शन, 6500 mAh बॅटरी अन बरच काही….
- आठव्या वेतन आयोगात 1800, 2000, 2800, 4200 आणि 4600 ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढणार? वाचा सविस्तर
- श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची घेतली भेट
- AI टेक्नोलाॅजिमुळे अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, टेक्नालॉजी, इलेक्ट्रॉनिक्सला पसंती