Monsoon Toruist Place : धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी ! धोकादायक ठिकाणीही पर्यटकांचा वावर, दुर्घटनेची शक्यता

Ahmednagarlive24 office
Published:
Monsoon Toruist Place

Monsoon Toruist Place : पालघर जिल्हा हा निसर्गसौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. पावसाळ्यात पालघर पूर्वेकडील भागात नैसर्गिक सौंदर्याची उधळण पाहावयास मिळते. पालघर शहरापासून सुमारे आठ किलोमीटर पुढे वाघोबा घाटात दोन धबधबे असून पालघर,

मुंबई व इतर ठिकाणचे पर्यटक सकाळपासूनच या धबधब्यांवर गर्दी करतात. काही अतिउत्साही पर्यटक या धबधब्यांच्या धोकादायक ठिकाणी जात असल्याने धोका संभवण्याची शक्यता असते. या धबधब्यापासून जवळच दुसरा धबधबाही याच परिसरात आहे.

पालघरहून जाताना घाटाच्या पलीकडच्या बाजूला एक तर अलीकडे दुसरा धबधबा आहे. गार पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी प्रत्येकजण पुढे सरसावत असतो. अनेक युवक, युवती तसेच अनेक कुटुंबे या धबधब्यावर सकाळपासूनच मजा घेत होते.

दोन दिवस पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे पर्यटकही आकर्षिले जात आहेत. वाघोबा खिंडीतून वर गेल्यानंतर काळदुर्गकडे जाणारा एक रस्ता लागतो. सुरुवातीला रस्त्यावर शासनाने बसण्याची व्यवस्था केली आहे.

तिथे एक मंदिरही आहे. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पर्यटक काळदुर्गकडे ट्रेकिंगसाठी रवाना होतो. मंगळवारी काळदुर्गाच्या पायथ्याशी शेकडो वाहने पार्क केलेली दिसली. या काळदुर्गावर शिवकालीन अनेक खुणा पाहायला मिळतात.

पिण्याच्या पाण्याचे टाके, मूर्ती, मंदिरे, तोफा पाहायला मिळतात. पालघर जिल्ह्यातील दुर्गप्रेमींनी तिथे साफसफाई करून गडवाटाही मोकळ्या केल्या आहेत. हा दुर्ग टेकिंगसाठी उपयुक्त असल्याचे पर्यटकांनी यावेळी सांगितले. यासारखे अनेक दुर्ग, धबधबे या परिसरात पाहायला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe