बाबा .. माझ्या वडिलांच्या एका चापटीने जर त्यांची अशी मानसिकता झाली असेल तर आज आमची मानसिकता कशी असेल!

Sushant Kulkarni
Published:

Ahilyanagar News: बाबा तुम्ही महंत अहात.तुमचा मान मोठा आहे.माझ्या वडीलांच्या मारेकऱ्यांना मारलेल्या एका चापटीने आरोपींची मानसिकता अशी होत असेल.तर माझ्या वडीलांचा एकही अवयव साबुद नव्हता, मग आमची माणसिकता कशी झाली असेल.आरोपींना ज्यांना समर्थन करायचे असेल त्यांनी खुशाल करावे. मात्र आमच्या न्याय मागण्यात अडथळे का ? माझ्या वडीलांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी आमचा लढा सुरु असल्याची भावना स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशुमख यांनी संत भगवान गडावर महंत नामदेवशास्त्री सानप यांच्यासमोर व्यक्त केली.

भगवान गडाचे मंहत डॉ.नामदेवशास्त्री सानप यांनी भगवानगडाचा धनंजय मुंढे यांना पाठींबा असल्याचे जाहीर केल्यानंतर रविवारी मत्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व भाऊ धनंजय देशमुख यांनी भगवान गडावर येवुन डॉ.नामदेवशास्त्री सानप यांची भेट घेतली.देशमुख यांच्या खुनातील
आरोपीवर किती गुन्हे दाखल आहेत याचे पुरावे देखील महंतासमोर ठेवले आहेत.

यावेळी बोलताना वैभवी देशमुख म्हणाली, माझ्या वडीलांच्या खुन करणाऱ्यांना वाचविणारे जातीवाद करीत आहेत.आमची शेतजमीन मुंढेच करीत होते.माझ्या वडीलांनी तर जातीवाद कधीच केला नाही.दलित मुलाला मारहाण झाली म्हणुन माझे वडील मदतीसाठी तेथे गेले होते.त्यांचा खुन करण्यात आला.बाबा तुम्ही आमचीही बाजु समजुन घ्यायला हवी होती.दृष्ट प्रवृत्तीना संपविण्यासाठी ही लढाई आहे.

यावेळी बोलताना धनंजय देशुमख म्हणाले, माझ्या भावाच्या हत्येतील आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रातील राज्यातील अनेकजण व पोलिस मदत करीत आहेत. त्यांना जातीवादी ठरविण्याचे काम होत आहे.असे झाले तर मग देशमुख कुटुंबासोबत न्याय मागायला कोणी येणार नाही.न्याय मागणाऱ्यांना जातीवादी ठरविण्याची चुक होवु नये.

आम्ही देखील भगवान गडाचे भक्त अहोत.यापुर्वी येथे येवुन गेलो अहोत. मत्साजोगच्या ग्रामपंचायतीला विकासाबाबत किती पुरस्कार मिळालेले आहेत.देशुमख यांचे काम जाती-पातीच्या पलीकडचे होते. तरीही त्यांची हत्या झाली. यावेळी वैभवी देशमुख व धनंजय देशमुख यांनी संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe