Pune News : धरणात बुडून पुण्यातील बाप-लेकीचा मृत्यू !

Ahilyanagarlive24 office
Published:

Pune News : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड – पांगारी खोऱ्यातील भोर तालुक्याच्या जयतपाडमध्ये मंगळवारी (दि. १५) स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) व ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी (१३, रा. औंध, पुणे) या बाप-लेकीचा धरणातील पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून भाटघर धरणाच्या बॅक वॉटरमधील भोर तालुक्याच्या जयतपाडमधील सीमा रिसॉटमध्ये पुण्यातील चार कुटुंबांतील १२ ते १३ पर्यटक सलग सुट्ट्या असल्याने फिरण्यासाठी आले होते.

रिसॉर्टच्या मागील बाजूस बेबी पूल पाहण्यासाठी हे पर्यटक गेले असता शिरीष धर्माधिकारी पुलाकडे धरणाच्या किनाऱ्यावरून न येता धरणाच्या खोल पाण्यात उतरले व मुलगी ऐश्वर्या हिला पोहण्यासाठी बोलावून घेतले. पाच ते सहा मिनिटे पोहत असताना दोघेही पाण्यात बुडाले व मृत्यू झाला.

तत्काळ स्थानिक ग्रामस्थांनी बुडालेल्या मायलेकीचा शोध घेतला. मात्र, मुलगी मृतावस्थेत आढळली. तर रात्री उशिरापर्यंत शिरीष यांचा मृतदेह आढळला नव्हता. बुधवारी (दि. १६) शिरीष यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

भोर पोलीस अशोक खुटवड, दत्तात्रय खेंगरे, सुशांत पिसाळ, अभय बर्गे, वर्षा भोसले, होमगार्ड समीर घोरपडे, भीमा पोलीस मित्र मुकेश गुमाणे, दत्ता पवार तसेच एकनाथ बैलकर यांनी अथक प्रयत्न करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe