पराभव जिव्हारी लागला…संतापलेल्या क्रिकेटप्रेमींकडून टीव्हीची तोडफोड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  टी 20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकतेच 24 ऑक्टोबर रोजी सामना खेळाला गेला होता. मात्र या बहुचर्चित सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला.

पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला नमवलं. दरम्यान या पराभवानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. बीडमध्ये तर क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडला आहे.

या क्रिकेटप्रेमींच्या नाराजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते.

यावेळी पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतीयांचा मोठा हिरमोड झाला होता. यामुळे क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्हीच जमिनीवर आदळला आहे.

टीव्ही फोडतानाचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ? हा व्हिडीओ मूळचा बीड येथील असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन क्रिकेटप्रेमी दिसत आहे. भारताचा पराभव झाल्यामुळे ते चांगलेच दु:खी झाले आहेत.

त्यांनी टीम इंडियावरील राग टीव्हीवर काढलाय. त्यांनी टीव्ही जमिनीवर आदळून तो फोडून टाकलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!