Pune – Amravati Express : दौंड-मनमाड रेल्वे मार्गांवर लवकरच सुरु होणाऱ्या पुणे-अमरावती एक्सप्रेसला राहुरी येथे थांबा मिळावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे.
दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. यामार्गावर आता अनेक नवीन रेल्वे गाड्या सुरु होत असून त्यात नव्याने सुरु होणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेस गाडीला राहुरी येथे थांबा मिळावा,

असे पत्र रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रोगोड यांच्या मार्फत रेल्वे मंत्रालय यांच्याकडे पाठविल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
तसेच शिर्डी-पंढरपूर या रेल्वेचा राहुरी येथील थांबा अनेक दिवसांपासून बंद करण्यात आला होता. वास्तविक पंढरपूरला जाणाऱ्या भाविक वर्ग मोठा असताना हा थांबा बंद करून
या भागातील भाविक व प्रवाशी यांच्यावर अन्याय होत आहे. तो थांबा पुन्हा सुरु करण्याची मागणीही माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी रणजित श्रीगोंड यांच्याकडे केली आहे.













