Mumbai Local : मुंबईची लोकल म्हंटली की सर्वांना ती गर्दी डोळ्यासमोर येत असते. मात्र टॅक्सी किंवा कारने प्रवास करायचा म्हंटल की ते ट्राफिक. पण ट्राफिकपेक्षा कधीही मुंबईची लोकल उत्तम आहे असे म्हंटले जाते.
मुंबईच्या ट्रॅफिकचा त्रास टाळण्यासाठी अब्जाधीश निरंजन हिरानंदानी यांनी देखील मुंबई लोकलने प्रवास केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हिरानंदानी ग्रुपचे 73 वर्षीय सह-संस्थापक आणि एमडी निरंजन हिरानंदानी यांनी शुक्रवारी त्यांचा मुबंई लोकलने प्रवास केल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
ते मुंबईच्या लोकलमध्ये इतर प्रवाशांच्या सोबत प्रवास करताना आणि प्लॅटफॉर्मवर थांबल्याचे दिसून आले. तसेच ते एसी डब्यात चढताना दिसले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.
निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले मुंबई लोकलचा अनुभव
निरंजन हिरानंदानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या मुंबई लोकलचा प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. मुंबईच्या ट्रॅफिकचा त्रास टाळण्यासाठी त्यांची मुंबई लोकलमधून प्रवास केल्याचे सांगितले आहे.
मुंबई ते उल्हासनगर या एसी कोचमध्ये त्यांनी प्रवास केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यांच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी हे सर्व काही स्क्रिप्टेड असल्याचे म्हंटले आहे.
कोण आहेत निरंजन हिरानंदानी?
रिअल इस्टेटमधील निरंजन हिरानंदानी हे एक सर्वात मोठे नाव आहे. निरंजन हिरानंदानी यांचे भाऊ सुरेंद्र हिरानंदानी यांनी हिरानंदानी ग्रुपची स्थापना केली होती. सुरेंद्र आता वेळे व्यवसाय करत आहेत मात्र आजही त्यांचे बंधू अनेक मालमत्तांचे मालक आहेत.
किती संपत्ती आहे
फोर्ब्सनुसार निरंजन हिरानंदानी यांची संपत्ती 1.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. निरंजन हिरानंदानी टॉप 100 अब्जाधीशांमध्ये असलेले एक अब्जाधीश आहेत. त्यांच्या पत्नी देखील त्यांचा व्यवसाय चालवतात. त्यांना दोन मुले देखील आहेत.