धनंजय मुंडे दोषी ठरले ! करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार…

Mahesh Waghmare
Published:

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांना करुणा मुंडे उर्फ करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी म्हणून द्यावी लागणार आहे.

करुणा शर्मा यांनी केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मान्यता दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, करुणा शर्मा यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी त्यांना पोटगी मिळाली पाहिजे. यापूर्वी करुणा शर्मा यांनी न्यायालयाकडे दरमहा 5 लाख रुपयांची पोटगी मागणी केली होती, मात्र त्याऐवजी त्यांना 2 लाख रुपये मंजूर करण्यात आले.

फॅमिली कोर्टाच्या निकालानंतर, करुणा शर्मा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “कोर्टाच्या निर्णयानंतर मला काही प्रमाणात न्याय मिळाला आहे, परंतु मला आणि माझ्या मुलांना अधिक योग्य प्रमाणात आर्थिक मदत मिळायला हवी. त्यामुळे मी हा निकाल हायकोर्टात आव्हान देणार आहे.”

तसेच, त्यांनी आपल्या संघर्षाबद्दल सांगितले की, “गेल्या तीन वर्षांपासून मी पोटगीसाठी लढा देत आहे. किती त्रास झाला हे सांगू शकत नाही. मंत्र्यासोबत माझी लढाई होती, पण सत्याच्या विजयासाठी माझ्या वकिलानेही कोणतेही शुल्क न घेता माझी बाजू मांडली. आज सत्याचा विजय झाला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, “करुणा मुंडे यांनी 4 फेब्रुवारी रोजी फॅमिली कोर्टात केस जिंकली, ही एक स्त्री म्हणून त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. न्यायालयाने त्यांना दरमहा 1.25 लाख रुपयांची पोटगी मंजूर केली आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे दुखापत करण्यात येऊ नये असेही निर्देश दिले आहेत.

करुणा शर्मा यांनी सांगितले की, “मी 1996 पासून नवऱ्यासोबत आहे आणि त्याप्रमाणेच माझ्या जीवनशैलीला साजेशी पोटगी मला मिळावी, ही माझी मागणी आहे. त्यामुळे मी पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी हायकोर्टात जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe