दिशा सालियन मृत्यू प्रकरण राज्यात गाजलं होत. दरम्यान या प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव बऱ्याचदा आणण्याचा प्रयत्न झाला. नितेश राणे यांनी तर वारंवार त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आता दिशाचा सामूहिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा दावा करत पुन्हा चौकशी करावी अशी मागणी आता नव्याने दिशा यांच्या आई वडिलांनी केलीये. धक्कादायक म्हणजे,

आदित्य ठाकरे यांच्यासह काही लोकांची 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड चेक करा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. आता या प्रकरणावर काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत मोठे वक्तव्य केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…
भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 58 वा गळीत हंगाम आज (दि.२०) संपन्न झाला. दिशा सालियनबाबत त्यांना यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 2014 पासून भारतामध्ये दबावाचे राजकारण खेळले जात आहे. त्यामुळे हे जे प्रकरण आहे त्यामागे राजकारण असण्याची शक्यता असून यामागे दबावतंत्राचा असेल असे मला वाटतं असल्याचे थोरात म्हणाले.
साखर क्षेत्रात एआय ची गरज : थोरात
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात माजी मंत्री थोरात यांनी विविध विचार मांडले. ते म्हणाले, संगमनेर तालुका व अमृत उद्योग समूह हे एक कुटुंब आहे.
कारखान्यामुळे अनेक शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी, विविध दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो. रात्रंदिवस अनेक चाके फिरत असतात सामूहिक कष्टातून यश मिळत असते.
आगामी काळामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. एआयसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असून थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम हे महाराष्ट्रात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.