अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- अधिकाऱ्यांच्या हातांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी ठरवले तर जनतेची अनेक प्रश्न त्वरित मार्गी लागू शकतात. तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सेवेची चांगली संधी आहे. असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे आले होते अण्णा हजारे यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर सुमारे तासभर चर्चा केली.
यावेळी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची विचारपूस केली नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असल्याचे जिल्हधिकाऱ्यांनी नमुद केले.
यावेळी अण्णांनी केलेल्या आंदोलनाचे स्वरुप त्या आंदोलनाला मिळालेले लोकांचे प्रेम महाराष्ट्रा सोबतच देशभरातील जनतेने यांना दिलेला पाठिंबा या विषयावर चर्चा झाली यावर अण्णांनी सांगितले लोकपाल विधेयक हा झालेला निर्णय क्रांतिकारी आहे माहितीचा अधिकार कायद्यासंदर्भात तसेच तो रद्द होऊ नये.
म्हणून केलेले प्रयत्न आळंदी आंदोलनाबाबत अशा अनेक विषयावर मनमोकळेपणाने दोघांमध्ये तासभर चर्चा झाली अण्णांनी जिल्हाधिकारी यांच्या या पूर्वीच्या कार्यकाळाबाबत जाणून घेतले व तेथे केलेल्या चांगल्या कामाबाबत देखील कौतुक केले.
असेच काम यापुढे या जिल्ह्यांमध्ये सुरू ठेवा असे अण्णा हजारे यांनी यावेळी म्हटले राळेगण सिद्धी येथील झालेल्या पाणलोटाच्या कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली माथा ते पायथा काम कसे केले गेले याविषयी जिल्हाधिकारी यांनी माहिती जाणून घेतली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved