Dhangar Reservation : आजही अनेक भागातील आदिवासी समाज विकासापासून वंचित आहे. त्यातच आदिवासींमध्ये धनगर समाजाचा समावेश करणे चुकीचे आहे. शासनाने आदिवासी समाजावर अन्याय करू नये. ओबीसी व धनगर समाजाच्या मागण्यास आमचा विरोध नाही; परंतु धनगर समाजास आदिवासी जमातीत समाविष्ट करू नये, असे मत डॉ. अनंत घाणे यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना डॉ. घाणे म्हणाले, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित राज्याचे मंत्री धनगर समाजाचे नेते यांच्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या हालचाली दिसत असल्याने आदिवासी संघटनांचा व समाजाचा तीव्र विरोध आहे.

सरकारने आदिवासी समाजाच्या भावनांचा विचार न केल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल. धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणातून कुठल्याही योजना देण्यात येऊ सुविधा, योजना देण्यात येऊ नये, आदिवासी समाजात धनगर समाजाला समाविष्ट करण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलने झाली आहेत होत आहेत.
आदिवासी समाजाची संस्कृती, राहणीमान, देवदैवते, जीवन पद्धती, पारंपारिक रूढी परंपरा, चालीरीती वेगळ्या आहेत. वेळोवेळी हे सिद्ध झाले असतानाही आदिवासी समाजात धनगर समाजास समाविष्ट करण्याच्या हालचाली होत आहे.
यापूर्वीही आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घूसखोरी झालेली आहे. शासनाने धनगर समाजास आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण द्यावे.
जर धनगर समाजाचा समावेश आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट शासनाने केल्यास आदिवासी समाज सरकारच्या विरोधात पेटून रस्त्यावर उतरेल. अकोले तालुका हा आदिवासी क्रांतिकराचा तालुका आहे.
धनगर समाजास आरक्षण देताना आदिवासी समाजावर अन्याय न करता धनगर समाजास आरक्षण द्यावे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात लावू नये, असे समाजसेवक डॉ. अनंत घाणे, तुकाराम खाडे, सोमनाथ सुकटे, सुरेश गभाले, भोरू खाडे, निवृत्ती बुळे, संकेत सामेरे, जाखेरे, पांडुरंग पदमेरे यांनी मत व्यक्त केले.













