डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल ! दोघांना जन्मठेप तिघे निर्दोष, काय काय घडले या ११ वर्षात, पहा..

Ahmednagarlive24 office
Published:

जवळपास अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज (दि.१० मे ) लागला. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल असून सचिन अणदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

तसेच त्यांना पाच लाखाचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणामध्ये पाच आरोपी होते त्यापैकी दोघे दोषी इतर 3 जणांची निर्दोष मुक्तता केली गेली. विरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर अशी निर्दोष सुटलेल्यांची नावे आहेत. त्यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुकत्ता करण्यात आली.

विरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान रचल्याचा तर संजीव पुनाळेकर यांनी शस्त्र नष्ट करण्याचा आरोपींना सल्ला दिला असल्याचा आरोप करण्यात आलेला होता.

तर सचिन अणदुरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या 302 कलमातंर्गत दोषी ठरलेले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली आहे. सोबतच पाच लाखाचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा असणार आहे.

काय व कधी घडली होती घटना ?
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू झाला होता.

खुनाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित करत खटल्यास सुरुवात केली व आज निकाल दिला. हा खटला जवळपास अडीच वर्षे सुरु होता.

दाभोलकर यांचा खून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर करण्यात आला. सुरवातीला पुणे पोलिस या खुनाचा तपास करत होते, त्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवला.

१५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती झाली.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe