अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचार्यांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. याचे जाळे हळूहळू राज्यभर पसरू लागले आहे.
राज्यातील सर्वच आगारांतील बससेवा बंद होऊ लागल्याने ऐन दिवाळीच्या निमित्ताने गावाकडे जाणार्या आणि येणार्या प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसू लागली आहे.
संप कधी संपेल, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे बसेस सुरु होण्याची वाट न पाहता अनेकांनी मिळेल त्या वाहनाने आणि मागतील त्या भाड्याने आज प्रवास करणे पसंत केले.
एकूणच बससेवा ठप्प झाल्याने एकीकडे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे एसटी महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे एसटी थांबली असताना खासगी बसेसचे प्रवासीभाडे जवळपास तिप्पट झाले होते.
टोल नाक्यांचे कारण देत अनेक खासगी व्यावसायिकांनी अतिरिक्त पैसे प्रवाशांकडून उकळले. अनेकांना पर्याय नसल्याने त्यांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळी झाली.तर काहींनी प्रवासभाडे कितीतरी अधिक असल्याने आपला प्रवासच रद्द केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम