चार एकरांत लाल केळी पिकवत कमावले ३५ लाख ! सिव्हिल इंजिनिअर झालेल्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा

शेतकरी सध्या आपल्या शेतात विविध पद्धतींचा वापर करत आहेत. अनेक युवा तरुण सध्या शेतीकडे वळले आहे. शेतात विविध प्रयोगकरत आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
lal keli

शेतकरी सध्या आपल्या शेतात विविध पद्धतींचा वापर करत आहेत. अनेक युवा तरुण सध्या शेतीकडे वळले आहे. शेतात विविध प्रयोगकरत आहेत.

त्यामुळे शेतीमधून भरगच्च उत्पादन हे तरुण घेत आहेत. अलीकडील काळात अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी परिस्थितीवर मात करत किमया केली आहे.

नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सफरचंद, काळा गहू, डाळिंब आदींच्या पिकातून लाखो रुपये कमावले असल्याचे उदाहरणे आहेत. आता आणखी एका शेतकऱ्याची यशोगाथा समोर आली आहे.

एका सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने ‘लाल केळी’च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावात त्याने लाल केळीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

५५ ते ६० रुपये दर
लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला ५५ ते ६० रुपयांचा दर मिळत आहे.

चार एकर क्षेत्रावर ६० टन माल निघाला होता. यातून त्यांना खर्च जाऊन ३५ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली.

तरुणांसाठी आदर्श
मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांमध्ये लाल केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच पंचतारांकित हॉटेलांमध्येही या केळीला मागणी आहे.

यावर्षी आणखी एक एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली असल्याचे अभिजित पाटील सांगतात. अलीकडच्या काळात तरुण शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत.

पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करत भरघोस उत्पादन घेता येते, तर काही उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता यशस्वी शेती करीत आहेत. नोकरीमागे पळणाऱ्या तरुणांसाठी हे उत्तम उदाहरण ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe