अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या विविध घोटाळ्यांप्रकरणी डिसेंबर २०२१ पर्यंत सक्तवसुली संचालनालय (ईडी) निश्चितपणे फास आवळेल, असे सूचक वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केले.
मुंबईतील आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी १९ बंगले खरेदी केले होते. या प्रकरणात आपण आवाज उठवल्यानंतर २०२१ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते स्वत:च्या नावावर करून घेतले आहेत.

तसेच मुंबईतील दहिसर परिसरातील आरक्षित जमिनीचा व्यवहारही संशयास्पद असून यामध्ये सुमारे ५५० कोटींचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली त्यादिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला केला आहे.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून केवळ राज्याची लूट करत आहे, असा गंभीर आरोप करत सोमय्या म्हणाले, ठाकरे यांच्या सूचनेनंतर आपल्यावर जीवघेणा हल्लाही करण्यात आला आहे. मात्र, मी ठाकरे सरकारातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सज्ज आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम