Eknath Shinde : मोठी बातमी! मराठा समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..

Published on -

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी प्रबळपणे मांडण्यासाठी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न तसाच असल्याने समाजात नाराजी आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, या दरम्यान मराठा समाजाला ओबीसी प्रमाणेच सर्व सवलती आणि सुविधा देण्यात येतील. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण मिळवण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. तसेच सारथी संस्थेकरिता निधीची तरतूद मोठ्या प्रमाणात करण्यात येईल.

यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह व्हावे, या वसतिगृह योजनेचा आराखडा तयार करण्यात यावा. सारथीच्या योजना सगळीकडे पोहोचविण्यासाठी दूत संकल्पना राबविण्यात यावी. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांवर आणखी भर देण्यात यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरता निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या महामंडळासाठी जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे जागा देण्यात येईल. या मंडळाच्या वित्त पुरवठ्याच्या अटींबाबत आणि अन्य बाबींबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News