Electric Cars News : अर्थसंकल्पात इलेक्‍ट्रिक कारसाठी खुशखबर ! शहरात २५ टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार

Content Team
Published:

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) च्या वाढत्या भावामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार (Electric Car) किंवा इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत किंवा घेण्याचा विचार करत आहेत.

आता या इलेक्‍ट्रिक कारसाठी अर्थसंकल्पात (budget) घोषणा झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. ई-वाहन धोरण- सन 2021 ते 2025 साठी महाराष्ट्र (Maharashtra) इलेक्‍ट्रिक वाहन धोरण मंजूर करण्यात आले आहे.

यामुळे आता एसटी, रिक्षा, सिटी बस, टॅक्‍सी या सार्वजनिक वाहतुकींच्या वाहनांमध्ये आता 25 टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यातील इलेक्‍ट्रिक वाहनांची नोंदणी 157 % ने वाढली आहे.

सन 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत इलेक्‍ट्रिक वाहनांचा हिस्सा 10 टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2025 पर्यंत 5 हजार चार्जिंग सुविधांच्या उभारणीचे उद्दीष्ट आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

कार (Car) घेण्याची हौस तर सर्वांनाच असते, मात्र पैशाअभावी आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तसेच दररोजच्या वाढत्या इंधनवाढीमुळे कार घ्यायची की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यावर आता या घोषणेने इंधनवाढीवर तोडगा निघणार असून सर्वसामान्यांना परवडणारी इलेक्ट्रिक कारबाबत वाढीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe