अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीजबिल होणार माफ, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे वीजबिलाचे ओझे कमी होऊन दिलासा मिळणार आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांचे वीज बिल माफ होईल अशी माहिती समजली आहे.

त्यासाठी शासनाकडून महावितरण महामंडळाला आर्थिक मदत केली जाणार आहे. परभणी, जालना, अहिल्यानगर, नांदेड, सातारा, नाशिक आदींसह १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

शेतकरी हा देशाचा कणा असूनही गेल्या काही वर्षांत वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. विशेषतः वीज बिलात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी ओझे होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. वीज बिल माफीसाठी महावितरण महामंडळाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत निधी ची तरतूद करण्यात येणार असून कृषी पंपधारक व अनुसूचित जातीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास मंत्रालयाकडून २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. महावितरणला वीज वितरणासाठी लागणारा निधी देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याचा परिणाम वीज वितरण व्यवस्थेवर होणार नाही.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वीज बिलाचा बोजा कमी तर होईलच परंतु त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळून उभारी देखील मिळेल. उत्पादन खर्चही कमी होणार आहे. अखेर सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आलेले आहे. विविध योजना देखील शासन नेहमीच राबवत आहे. आता या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe