Kalsubai Trek : भंडारदऱ्यासह महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला पर्यटकांची पसंती, रोडवरच ट्राफीक जाम

Ahmednagarlive24 office
Published:
Kalsubai Trek

Kalsubai Trek : महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर गिर्यारोहकांनी फुलले असून हजारो गिर्यारोहकांनी शिखर सर करण्यासाठी बारी गावामध्ये तळ ठोकल्याचे निदर्शनास येत आहे.

अकोल्यातील बारी गावाच्या पायथ्याशी असलेले कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. हे शिखर सर करणे म्हणजे पर्यटकांचे स्वप्न असते. तसेच निसर्गाची मुक्त हस्ते उधरळण झाली किंवा वर्षा ऋतुत भरगच्च पावसात निसरड्या वाटा,

पोपटरंगी हिरवाई, कोसळणारा धो-धो पाऊस अंगावर घेत कळसुबाई शिखराचे गिरीभ्रमण करणे गिर्यारोहकांसाठी किंवा पर्यटकांसाठी एक आगळी वेगळी मोहीम असते. कळसुबाई शिखरावर सध्या गिर्यारोहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

रोज हजारे गिर्यारोहक तसेच पर्यटकही कळसुबाई शिखर स करण्यासाठी येत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्यासह महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला पर्यटकांनी अक्षरशः गराडा घातल्याचे चित्र निर्माण झाले आहे कळसूबाईला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे स्थानिक तरुणांना मात्र हॉटेल तसेच वाटाड्याच्या स्वरुपात चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

कळसुबाई शिखरावर पर्यटकांना सुखरुपपणे जाता यावे यासाठी राजुरच्या प्रादेशिक वनविभागाच्या वतीने लोखंड शिड्यांची उभारणी केली गेली असुन या शिड्यांच्य मजबुतीकरणाचे काम प्रादेशिक वनविभागाच्य वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती साळवे व वनपाल जब्बार पटेल यांनी व्यवस्थित केले असल्याने गिर्यारोहकांन शिखर सफरीचा आनंद घेता येत आहे.

कळसूबा शिखरावर होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी पर्यटकांची वाहने ही कोल्हार घोटी रोडवरच अस्ताव्यस्त लावली जात असल्यानेही या रोडवरच ट्राफीक जाम होत असुन स्थानिक ग्रामपंचायतने याबाबत लक्ष घालुन वाहनतळाची व्यवस्था करुन दिल्यास ग्रामपंचायतच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. राजुर पोलिसांनीही अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe