‘लाडकी बहीण’चा फॉर्म घरच्या घरी भरा ! झटपट डाऊनलोड करा, अन.. जाणून घ्या सविस्तर

ही योजना जाहीर झाल्यानंतर यासाठी फॉर्म भरण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज देखील मिळाले नाही तर अनेक ठिकाणी हे अर्ज दाखलही करून घेता आले नाही. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला भरून देता येणार आहे.

Published on -

सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठा चर्चेचा विषय झाला आहे. आज राज्यातील प्रत्येक पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी धडपड करत आहे.

या योजनेमध्ये आता २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा फायदा उठवता येणार असून पाच एकर जमिनीची अट देखील रद्द करण्यात आली आहे. दरम्यान ही योजना जाहीर झाल्यानंतर यासाठी फॉर्म भरण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज देखील मिळाले नाही तर अनेक ठिकाणी हे अर्ज दाखलही करून घेता आले नाही. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला भरून देता येणार आहे.

यासाठी तुम्हाला या योजनेची पीडीएफ फाईल डाऊनलोड करावी लागेल. नाव, पत्ता आणि इतर सगळे तपशील या फॉर्मवर फील करावे लागतील. अर्ज भरून झाला की तो पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. सोबतच आवश्यक ती कागदपत्रे देखील अपलोड करावे लागणार आहेत.

कसा भराल फॉर्म ?
जो अर्ज देण्यात आलाय तो घ्या व त्यावर महिलांनी आधी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म ठिकाण, पिनकोड आदी माहिती भरावी. बँक खात्याशी संलग्न असणारा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही या अर्जात भरा.

या अर्जात वैवाहिक स्थितीची माहिती देखील भरणे गरजेचे आहे. याशिवाय, तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का? याबाबतही माहिती देऊन त्या योजनेतून महिन्याला किती पैसे मिळतात हे देखील यात भरा.

तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या बँक खात्यात पाहिजेत त्याचे डिटेलसत्यात टाकावेत. संबंधित बँकेचा IFSC कोड, बँकेचे पूर्ण नाव, बँक खात्याचा क्रमांक आदी गोष्टी सविस्तर न चुकता भरा. अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी आहे की सरकारी नोकर ते देखील भरून घ्या.

‘त्या’ सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द 
ज्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न होईल त्या सेतू सुविधा केंद्रावर कारवाई होणार आहे. त्या आर्थिक लूट करणाऱ्या सेतू सुविधा केंद्राचा परवाना देखील रद्द करण्यात येईल, असा कडक इशाराच उपमुख्यंमत्री फडणवीसांनी दिलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News