अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Maharashtra News :- सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जगभरात चर्चेचा विषय आहे. या युद्धाचा फटका आता देशवासियांना दिसून येणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
राहुल गांधींचे लोकांना आव्हान…
तुम्ही लवकरात लवकर पेट्रोलच्या टाक्या भरुन घ्या, कारण “इलेक्शन ऑफर” लवकरच संपणार आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान प्रत्यक्षात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शनिवारी संपला आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून भाजप सरकार निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ थांबवते आणि निवडणुका संपल्या की लगेचच दर वाढवतात असा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा सध्याचा टप्पा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 7 मार्चला संपणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान पुढील आठवड्याच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.