Flour mill : देशात मोदी सरकार अनेक उपाय योजना राबवत असते. या योजनेचा असेक गरजू लोक लाभ घेत असतात. अशीच एक योजना सध्या राबवली जात आहे, ज्या योजनेतून महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे.
दरम्यान, या योजनेचे नाव आहे मोफत पिठाची गिरणी वाटप असे आहे. महिलांसाठी सरकारने मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू केलेली असून या योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरणे चालू देखील झालेले आहेत.हे फॉर्म कोठे भरायचे, कोणाकडे सबमिट करायचे तसेच या योजनेसाठी कोणती पात्रता आहे या बाबतची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हे दोघे मिळून देशातील महिलांसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि स्कीम राबवत आहेत. या योजना देशातील महिलांसाठी कल्याणकारी योजना असतात. जेणेकरून महिलांना त्यांच्या स्वताच्या पायावर उभे राहून कुटुंबातील गरजा पूर्ण करता येतील.
सरकारच्या योजना अंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. म्हणजेच बायकांना पिठाच्या गिरणी घेण्यासाठी सरकार हे १००% अनुदान देणार आहे. यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब बायकांची आर्थिक स्थिती चांगली होईल.
याच बरोबर ग्रामीण भागा मध्ये बायकांना रोजगार सुध्दा उपलब्ध होईल. या मुळे महाराष्ट्र सरकारने ग्रीन भागातील बायकांना मोफत पिठाची गिरणी वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
आवश्यक कागदपत्रे-
आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असावा)
पॅनकार्ड
बँक पासबुक
रहिवाशी दाखला
उत्पन्न दाखला
जातीचा दाखला
मोबाईल नंबर
अर्ज कसा करावा?
आपण हा अर्ज ऑन लाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतो. संबंधित पंचायत समिती मध्ये या योजनेचे अर्ज आपल्याला मिळतात. किंवा आँनलाईन नेट कॅफे वरून पण आपण यासाठी अर्ज करू शकतो