Mula Dam Water Level : मुळा धरण सलग तिसऱ्या वर्षी जुलै महिन्यातच निम्मे भरले

Ahilyanagarlive24 office
Published:

Mula Dam Water Level :  २६ टीएमसी क्षमता येथील मुळा धरण काल रविवारी रात्री ५० टक्के भरले आहे. काल सायंकाळी उशिरा मुळा धरणाचा पाणीसाठा १३ टीएमसीवर पोहोचला होता. काल रविवारी सायंकाळी सहा वाजता मुळा धरणाचा पाणीसाठा १२ हजार दशलक्ष घनफूट इतका झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

सलग तिसऱ्या वर्षी मुळा धरण जुलै महिन्यातच निम्मे भरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुळा धरणाच्या पाणीसाठ्याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाच्या वर्षी पावसाची काय स्थिती राहील, याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते. मात्र मुळा धरणात यावर्षी ३ जुलै २०२३ लाच नव्याने ‘पाणी दाखल झाले होते. त्यामुळे यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाचे संकेत मिळाले होते.

गेल्या वीस दिवसात धरणात पाणलोट क्षेत्रातून नव्याने चार टीएमसी पाणी दाखल होत, काल सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १३ हजार दशलक्ष घनफुटावर पोहोचला होता. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता राजेंद्र पारखे, शाखा अभियंता विलास पाटील, धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहेत. जुलै महिन्यातच मुळा धरण निम्मे भरल्याने यंदाच्या वर्षी देखील धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्याचे चित्र मुळा लाभ क्षेत्रात राहुरी, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, नगर तालुक्यामध्ये दिसून येत आहे.

गेल्या वीस वर्षांमध्ये मुळा धरण अकरा वेळा जुलै महिन्यात निम्मे भरलेले आहे. यंदाची ही बारावी वेळ आहे. काल सायंकाळी धरणाची पाणी पातळी १७८३.८० इतकी झालेली होती. तर २.५० मीटरला मुळा धरणाकडे ळळित खुर्द कोतुळ कडून ४हजार २२७ पाण्याची आवक सुरू होते. मुळा धरणात गेल्या दीड दिवसात पाहून टीएमसी पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe