अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- १०० कोटी वसुलीच्या प्रकरणी सोमवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुखांना अटक करण्यात आली होती.
देशमुखांना विशेष न्यायालया समोर हजर केलं. ६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने देशमुखांना ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे यंदाची अनिल देशमुखांची दिवाळी ईडी कोठडीत जाणार आहे.
१०० कोटी वसुलीच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीकडून अनिल देशमुख यांना पाच समन्स बजावले होते. मात्र एकदाही अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.
याप्रकरणात अनेक न्यायालयीन पर्याय त्यांनी निवडले. मात्र, सोमवारी अचानकपणे ईडी कार्यालयात देशमुख हजर झाले. ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी एका व्हिडिओतून अनिल देशमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
त्यानंतर अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले. मग अनिल देशमुखांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून काही अधिकारी मुंबईला पोहोचले. तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर देशमुखांना अटक करण्यात आली.
त्यानंतर देशमुखांना मुंबईतील सत्र न्यायालयीत सुट्टीकालीन विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आलं. न्यायमूर्ती पी.बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने देशमुखांना ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे यंदाची अनिल देशमुखांची दिवाळी ईडी कोठडीत जाणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम