माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणतात: मी खाली बसले, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  परळी मतदारसंघात माझा पराभव झाला, मी खाली बसले, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले. राज्यात मंत्री असताना परळी मतदारसंघापेक्षाही जास्त निधी शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाला दिला.

परळी ही आई तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघ ही मावशी आहे, असे स्व. गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणत असत. असे प्रतिपादन माजी महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

औरंगाबादला जात असताना त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला.या वेळी मुंडे म्हणाल्या की, पदामुळे माणूस मोठा होत नाही किंवा पद गेले तरी छोटा होत नाही. ही शिकवण आम्हाला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी दिली.

त्यामुळे सत्ता असो वा नसो जेथे जावू तेथे लोक गर्दी करतात. हीच स्व. मुंडे यांची देणगी आहे. सत्ता होती त्यावेळी राज्यात सर्वत्र मोठया प्रमाणात निधी दिला. आता सत्ता नाही वेळ आहे म्हणून वेळ देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe