Maharashtra news : आयुक्तपदावरून पायउतार होताच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना इडीचे समन्स आले आहे. सेवानिवृत्त होऊन तीन दिवस होत असताना त्यांच्याविरूद्ध कारवाई सुरू झाली. पांडे यांच्यावर शिवसेनेच्या जवळचे असल्याचा आरोप केला जात होता.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हे समन्स पाठविण्यात आले असून त्यांना ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पांडे हे शिवसेनेच्या जवळचे असल्याचा आरोप भाजपने केला होता.

तसेच ठाकरे सरकारच्या काळात अनेक भाजप नेत्यांवर त्यांनी कायदेशीर कारवाईचा दंडुका उचलला होता. त्यामुळे भाजप विरुद्ध पांडे असा सामना आधीपासूनच होता. आता ईडीने समन्स पाठविल्याने पांडे यांना अडकविण्याची तर तयारी केंद्रीय संस्थांनी केली नाही ना, याची शंका व्यक्त होत आहे.