Free Solar Panel Yojana 2023 : विजेची कमतरता व वाढीव वीजबिल यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने मोफत सौर पॅनेल योजना राबवत आहे. तसेच सरकारच्या या योजनेचे घोषवाक्य ‘प्रत्येक घराच्या छतावर सौरऊर्जा!’ हे आहे.
पंतप्रधान मोफत सौर पॅनेल योजनेचे उद्दिष्टे

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत सौर पॅनेल योजनेद्वारे विजेची उत्पादकता वाढवणे आणि सध्या वीज नसलेल्या भागात वीज उपलब्ध करून देणे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार सौर पॅनेलचे मोफत वाटप करणार आहे. मात्र सध्या तरी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नाही.
पीएम मोफत सौर पॅनेल योजनेचे फायदे
– विजेचा वाढता वापर पाहता सरकार सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करून वीज वाढवणार आहे.
– Pm मोफत सौर पॅनेल योजना 2023 चा लाभ अशा भागात मिळेल, जिथे वीज पोहोचत नाही.
– प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजनेमुळे शेतकरी सौरऊर्जेद्वारे त्यांची उत्पादकता वाढवू शकतात.
– सौर पॅनेलद्वारे उत्पादित केलेल्या ऊर्जेचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता आणि उत्पन्न वाढवू शकतात.
– सोलर पॅनलची किंमत कमी आणि उत्पादकता जास्त, उत्पन्न वाढेल.
PM मोफत सौर पॅनेल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
पंतप्रधान मोफत सौर पॅनेल योजना 2023 साठी ऑनलाइन अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत. लवकरच या योजनेचे ऑनलाइन अर्ज अधिकृत पोर्टलवर सुरू केले जातील.