‘गंगामाई’ इतर कारखान्याप्रमाणेच ऊसदर देणार मुळे

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : यंदाच्या हंगामात पाऊस कमी असल्यामुळे उसाचे लागवड क्षेत्रात घट झालेली आहे तसेच ऊस उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. मागील दोन्ही हंगामामध्ये उसाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे वेळेत गाळप केलेले आहे.

या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु गंगामाई कारखाना नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस घेण्यास प्राधान्य देत राहिलेला आहे त्यामुळे या हंगामातही आपले कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे.

या हंगामात गंगामाई कारखाना परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देण्यास कुठेही कमी पडणार नसल्याचे गंगामाई कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजितभैय्या मुळे यांनी आश्वासन दिले. गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स लि. हरिनगर,

नजिक बाभुळगांव या साखर कारखान्याचा १३ वा गळीत हंगाम शुभारंभ कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी कार्यकारी संचालक रणजीतभैय्या मुळे, संचालक समिरभैय्या मुळे, पार्थदादा मुळे यांच्या उपस्थितीत मुख्य शेतकी अधिकारी संदीप आणि वैशाली मनाळ यांच्या हस्ते गव्हाण व मोळीची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच बॉयलर अग्निप्रदीपन विजयश्री सुदाम मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी व विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले.

१ नोव्हेंबरपासून कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करण्यासाठीची पुर्वतयारी झालेली असल्याचे व्हाईस प्रेसिडेंट व्हि. एस. खेडेकर यांनी सांगितले व उपस्थित सर्वांना कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने विजयादशमीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe