Gautami Patil : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठे वक्तव्य केले होते. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी दिली होती. आता यावर गौतमीने दादांना उद्देशून आवाहन केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केल्याचे गौतमी पाटील हिने सांगितले होते. तरीही काही ट्रोलर्स ट्रोल करत असतात. दादा खूप मोठे आहेत. दादांना मी काही बोलू शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे. मी माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या.
तरीही अजूनही लोक मला ट्रोल करीत आहेत. ते कोण आहेत, हे मला माहिती नाही. लोक माझे जुने व्हिडिओ टाकत आहेत. माझी प्रसिद्धी काहींना पहावत नाही, असेही तिने म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी चित्रपट, सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती.
यावेळी गौतमी पाटीलच्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचे आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार आली होती. यावर अजित पवार यांनी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.
त्यानुसार, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. यामुळे आता गौतमी पाटील हिने यावर भाष्य केले आहे.