Gautami Patil : गौतमी पाटील सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने महेश्वर मित्र मंडळाच्या वतीने प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाची बरीच चर्चा झाली आहे.
या कार्यक्रमात मंचासमोर एक तरुण गौतमीसारखा डान्स करुन गौतमीला टक्कर देण्याचा प्रयत्न करत होता. या तरुणाचे नाव पवन चव्हाण असे होते. गौतमी पाटीलचे नृत्य सुरू असताना मंचासमोर एका तरुणाने पाटलांचा बैलगाडा गाण्यावर गौतमी सारखाच डान्स करण्याचा प्रयत्न केल्याने त्या तरुणाची जोरदार चर्चा होत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-Capture-199.jpg)
गौतमीने देखील त्याचे कौतुक केले आहे. या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी गौतमी पाटीलच्या स्टेप्स फॉलो करत जशाच तसा डान्स करत असतो.
स्टेजवर गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नाचत आहे. तिला टक्कर देत हा तरुण स्टेजखाली नाचत आहे. एकीकडे गौतमीचे नृत्य पाहून सर्वजण तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धावपळ करतात तर दुसरीकडे तिला पाहून हा तरुण तिच्यासारखा डान्स करत आहे. यामुळे त्याच्याकडे देखील अनेकांनी लक्ष वेधून घेतले होते.
दरम्यान, गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता अनेकदा कार्यक्रम उरकला जातो. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची तुफान गर्दी होते. अगदी छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील तिचा कार्यक्रम ठेवला जातो.