Gautami Patil : सध्या राज्यात फक्त गौतमी पाटीलची चर्चा सुरू आहे. तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर ती पुन्हा एकदा कार्यक्रम करू लागली आहे. असे असताना तिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचे बघायला मिळाले.
नाशिकमध्येही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात असाच राडा झाला. प्रेक्षकांनी कार्यक्रमात प्रचंड हुल्लडबाजी केली. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी चाहते इतके उतावीळ झाले की हे प्रेक्षक हे मार्केट शेडच्या खांबावर चढले. विनंती करूनही ते खाली यायला तयार नव्हते.

त्यांना विजेचा शॉक लागेल याचीही पर्वा केली नाही. त्यामुळे अखेर गौतमी पाटील हिने मोठा निर्णय घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गौतमीने अखेर अर्धा तास आधीच कार्यक्रम गुंडाळण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
गौतमीच्या कार्यक्रमात हे पहिल्यांदाच घडत होते. तिला कार्यक्रम मध्येच सोडावा लागला. या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी या झाली होती. यामुळे सतत गोंधळ होत होता.
काहींनी जागा मिळत नाही म्हणून कांदा मार्केटच्या खांबवर चढून कार्यक्रम पाहणे पसंत केले. खांबावर लाईट लावलेली होती. विजेचा शॉक लागण्याची पर्वा न करता प्रेक्षक खांबावर चढून बसले होते. यामुळे कार्यक्रमच बंद करण्यात आला.