हा सिनेमा बघायला जा, टिकीट दाखवा आणि बुलेट घेऊन जा, सिनेरसिकांसाठी अनोखी ऑफर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  रॉयल एन्फिल्ड गाडीचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो, पण त्याची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे सर्वानाच ती गाडी घेणे शक्य होत नाही. या गोष्टीचा विचार करून निर्माते आणि अभिनेता जे. उदय यांनी एक संकल्पना योजली आहे.

आगामी मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ हा सिनेमा बघायला जा त्याचे तिकीट दाखवा आणि आपली हक्काची बुलेट घरी घेऊन जा, अशी ऑफर अभिनेते जे. उदय यांनी आयोजक केली आहे.

अभिनेते जे. उदय यांनी ‘लॉ ऑफ लव्ह’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आपल्या प्रियजनांसोबत हा चित्रपट बघायला या आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा, अशी संकल्पना निर्मात्यांनी दिली आहे. तसेच या लकी ड्रॉ स्पर्धेमार्फत आम्ही तब्बल 50 बुलेट महाराष्ट्रातील आपल्या रसिक प्रेक्षकांना देऊ इच्छित आहोत.

याने त्यांचा व्हॅलेंटाईन आणखीच खास होईल याची आम्हाला खात्री आहे. असे अभिनेते आणि निर्माते जे. उदय यांनी म्हंटले आहे. हा सिनेमा 4 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून,

अभिनेत्री शालवी शाह या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेते जे. उदय हे सुद्धा अभिनय करताना पहायला मिळणार आहे.

याचबरोबर या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.

प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात आम्ही यशस्वी होऊ’, असे या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News