Goa Assembly Election Result : जी किशन रेड्डींचे भाजपकडून कौतुक; गोव्यातील विजयाआधीच दिला होता ‘हा’ कौल

गोवा : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly election results) लागले असून या निवडणुकांमध्ये भाजपला भरगोस यश मिळाले आहे. यामुळे भाजप (Bjp) पक्ष अजून मजबूत झाला आहे.

गोवा विधानसभा मध्ये देखील भाजपने झेंडा फडकवला आहे. या विजयामागे विकास मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांचा मोठा हातभार असल्यामुले भाजपकडून त्यांचे कौतुक होत आहे.

अशावेळी भाजपसमोरील अनेक अडचणी दूर करत भाजपला सत्तेत बसवण्यात जी किशन रेड्डी यांचा महत्वाचा वाटा आहे. गोव्यात भाजपला तीन अपक्षांनी तर एमजीपीनेही पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजप गोव्यात सत्तास्थापन करेल हे स्पष्ट आहे.

गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत जी किशन रेड्डी यांनी गोव्यात रणनिती आखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस आणि जी किशन रेड्डी यांची संपूर्ण रणनिती ही 67 टक्के विरोधी मतांवर आधारित होती.

खरं तर गोव्यातील निवडणूक बहुरंगी बनली होती. कारण टीएमसी, आप यांच्यासह स्थानिक पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसनंही (Congress) गोव्याचा निवडणुकीत उडी घेतली होती.

दक्षिण गोव्यातील मतदारांनी काँग्रेसला पर्याय म्हणून टीएमसी आणि आपच्या बाजने कौल दिल्यास त्याचा फायदा भाजपला होईल, हे ओळखण्यात जी किशन रेड्डी यशस्वी ठरले आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि जी किशन रेड्डी हे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत एक एक जागेचे महत्व ओळखून उमेदवार निवड आणि निवडणूक प्रचारातील चुका टाळत भाजपला विजय मिळवून दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe